आनंद (गुजरात) – एकूण आर्थिक परिस्थिती पाहता आगामी काळात दुधाच्या किमती वाढत जाण्याची शक्यता अमूल या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आर यस सोधी यांनी व्यक्त केली आहे.
इंधन, वाहतूक, पॅकेजिंग इत्यादीचा खर्च वाढत असल्यामुळे ही दरवाढ अटळ आहे. किती दर वाढ होईल हे सांगता येत नाही. मात्र दरवाढ होत राहणार असल्याचे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षात या कंपनीने दुधाच्या दरात आठ टक्क्यांनी वाढ केली आहे. या महिन्यात दुधाच्या किमती दोन रुपयांनी वाढल्या आहेत.
ते म्हणाले की एकूणच महागाई वाढत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक पतधोरणात काय करते यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. या दरवाढीतील बराच भाग शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतो असेही त्यांनी स्पष्ट केले. विजेचे दर वाढल्यामुळे दूध साठवण्याचा खर्च वाढत आहे. त्याचबरोबर वाहतुकीचा खर्चही वेगात वाढत असल्याचे ते म्हणाले.