बेल्हे (पुणे)- बेल्हे (ता. जुन्नर) येथील बाजार समितीच्या हद्दीत असणाऱ्या विहिरीत माय लेकीचा मृतदेह सोमवारी (दि. 31) आढळून आला आहे.
बेल्हे गावातील बाजार तळावरील विहीर साधारण 60 फूट खोल असणाऱ्या विहिरीत सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीला विहिरीत दोन मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. त्या व्यक्तीने तात्काळ ही माहिती पोलीस पाटील बाळकृष्ण पिराजी शिरतर यांना दिली. खात्री करण्यासाठी पोलिस पाटील त्या ठीकाणी गेले असता. विहिरीत दोन मृतदेह आढळून आले.
शितल संतोष भालेराव (वय 40 वर्ष) मुलगी आर्या संतोष भालेराव (वय 5 वर्ष) या मायलेकीचे असल्याचे शीतल भालेराव यांचे पती संतोष भालेराव यांनी ओळखले. या दोघी रविवार (दि.30) रात्रीपासून घरातून निघून गेल्या होत्या. दरम्यान, ही माहिती कळता मी या ठिकाणी आलो तर ते मृतदेह माझी पत्नी व मुलगी असल्याचे त्यांनी पोलिस पाटलांना संतोष भालेराव यांनी सांगीतले.
पोलिस पाटील यांनी आळेफाटा पोलिस स्टेशनला खबर दिली असता आळेफाटा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक टी. वाय. मुजावर तातडीने घटनास्थळी हजर झाले. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. त्यावेळी सहाय्यक फौजदार एस. एम. भवारी, पोलीस नाईक संदीप फड, नरेंद्र गोराणे, एम. एस. पठारे, मोहन आनंदगावकर व पोलिसांना मदत करणारे राजेंद्र मटाले, स्वप्नील भंडारी, मयुर भालेराव, गौस इनामदार, वसंत पाबळे, पोपट संभेराव, ऍम्बुलन्स चालक अकबर पठाण, रोहीदास पिंगट या ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढले. पुढील तपास आळेफाटा पोलिस करत आहेत.