पुणे -म्हाडा’ने 4 हजार 222 सदनिकांसाठी सोडत जाहीर केली आहे. या सोडतीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून 52 हजार 928 इतके अर्ज आले आहेत. घरांच्या सोडतीसाठी गुरुवारी (दि. 16) शेवटची मुदत आहे.
मात्र, सोडतीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने म्हाडा’ने अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागरिकांना म्हाडा’च्या घरांसाठी 22 डिसेंबरपर्यंत
ऑनलाइन अर्ज म्हाडाच्या संकेतस्थळावर करता येणार आहे. तर सोडत 7 जानेवारी 2022ला पुणे जिल्हा परिषद सभागृह येथे होणार आहे.