एका चार्जिंगमध्ये तब्बल 800 किमी धावणारी MG मोटर्सची कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार येतेय..!

एमजी मोटरने आपल्या दोन-दरवाजाच्या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या कॉन्सेप्ट कारला ‘सायबरस्टर’ असे नाव आहे. ही कार एकदा पूर्ण चार्जिंग केल्यावर 800 किमीचा प्रवास करू शकेल असा दावा कार उत्पादकांनी केला आहे आणि यात 5 जी कनेक्टिव्हिटी सारखे आधुनिक तंत्रज्ञानही असेल.

ही कार केवळ 3 सेकंदात 0 ते 100 किमी / तासाचा वेग पकडेल. 31 मार्च रोजी प्रथमच जगासमोर ही भन्नाट कार सादर केली जाईल.

या कारच्या प्रोटोटाइप स्केचचे काही फोटो प्रसिद्ध झाले आहेत. स्पोर्ट्स कारच्या चेसिसवर ही कार तयार केली जाईल आणि लिथियम आयन बॅटरीने सुसज्ज असेल. या कारची उंची कमी ठेवण्यात येणार आहे आणि त्याचे बॉडी पॅनेल एरोडायनामिक डिझाइनसह बनविण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.