मुंबई – जगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटपैकी एक, मेट गाला, अतिथी म्हणून उपस्थित राहिलेल्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत आलिया भट्ट सामील झाली आहे.
या खास प्रसंगी तिच्या लूकच्या बाबतीतही अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना निराश केले नाही. डोक्यापासून पायापर्यंत, ती रेड कार्पेटवर इतकी जबरदस्त दिसली की चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे, आलियाच्या पहिल्या मेट गाला दिसण्यासाठी हा कस्टम गाउन तयार करण्यात आला होता. लो कट यू नेकलाइन आणि ब्रॉड स्लीव्हलेस डीटेल या गाऊनमध्ये होते.
आलियाच्या गाऊनचे मोती सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. अभिनेत्रीच्या कपड्यांवर 1 लाख मोती जडले होते. हा गाऊन भारतात तयार करण्यात आला आहे.
प्रसिद्ध नेपाळी-अमेरिकन फॅशन डिझायनर प्रबल गुरुंगलाने हा ड्रेस तयार केला आहे. अभिनेत्रीच्या लुकला परफेक्ट टच देण्यासाठी कस्टम मेड ग्लोव्हज, स्टेटमेंट ज्वेलरी आणि निर्दोष हेअर-डू आणि मेकअप करण्यात आहे. आलिया भट्टचा हा लूक ब्राइडल लूकच्या श्रेणीतील होता. खरं तर, यावेळी, कार्ल लेजरफेल्ड: ए लाइन ऑफ ब्युटी या थीमचे अनुसरण तयार करण्यात आला आहे.