पंजाब – पंजाब सरकारने सर्व सरकारी कार्यालयांच्या वेळेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून पंजाबमधील सर्व सरकारी कार्यालये सकाळी 7:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. याची सुरुवात स्वत: मुख्यमंत्री भगवंत मान केली आहे. आज सकाळी 7:30 च्या दरम्यान ते कार्यालयात हजर झाले होते. तसेच इतर मंत्रीही सकाळीच कार्यालयात पोहोचले होते.
उन्हाळ्यात विजेचा वापर कमी करण्यासाठी पंजाब सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. याआधी कामाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 अशी होती, परंतु ती बदलण्यात आली आहे. या अभियानातून विजेची बचत होणार असल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले. आमच्याकडे विजेचा तुटवडा नसला तरी कार्यालयीन वेळेत बदल केल्याने दररोज 350 मेगावॅट विजेची बचत होईल. यातून साधरण 16 ते 17 कोटींची बचत होणार आहे, असे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले.
#WATCH | Punjab CM Bhagwant Mann reached his office at 7:30am today, after the Punjab government took the decision to operate all govt offices from 7:30am to 2pm from today, in a bid to save electricity. pic.twitter.com/jsnz4gGjOC
— ANI (@ANI) May 2, 2023
मात्र घरगुती आणि औद्योगिक लोकांसाठी वीज कपात होणार नसल्याचे मान यांनी स्पष्टपणे सांगितले. 2 मे ते 15 जुलैपर्यंत पंजाबमधील सरकारी कार्यालये सकाळी 7:30 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार आहेत.