मुंबई – साऊथ सुपरस्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना आई-वडील झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज 20 जूनला उपासनाने एका छोट्या परीला जन्म दिला. लग्नाच्या 11 वर्षानंतर राम चरण आणि उपासना यांच्या घरात लक्ष्मीचा प्रवेश झाला आहे. हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटलने मेडिकल बुलेटिन जारी करून माहिती दिली आहे की उपासना आणि तिचे मूल दोघेही ठीक आहेत.
बाळाच्या जन्माच्या काही तास आधी राम चरणने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने संगीतकार काल भैरवने त्यांच्या बाळासाठी बनवलेली एक ट्यून शेअर केली होती. तसेच त्याच्या व उपासनाच्या वतीने काल भैरवचे आभार मानले होते.
एका मुलाखतीदरम्यान राम चरणची पत्नी उपासना यांना विचारण्यात आले की, ‘लग्नाच्या इतक्या वर्षांनी तिने आई होण्याचा निर्णय का घेतला? तेव्हा ती म्हणाली होती, ‘मी खूप आनंदी आहे. आमच्या पहिल्या मुलीचे स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहे. मला सुद्धा आनंद आहे की, मी आई होण्याचा निर्णय समाजाच्या इच्छेनुसार न घेता आणि मला पाहिजे तेव्हा घेतला आहे. मला वाटतं आम्हा दोघांसाठी आणि रामसाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे, कारण आम्ही दोघेही आनंदी आहोत. आर्थिकदृष्ट्या मजबूत आहोत. आमच्या मुलांची काळजी घेण्यास सक्षम आहोत.
‘हा माझा आणि रामचा परस्पर निर्णय होता. आम्हा दोघांनीही कुटुंबाचा किंवा समाजाचा दबाव आमच्यावर येऊ दिला नाही. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर आई-वडील होण्याचा आमचा निर्णय राम आणि माझे ऋणानुबंध किती घट्ट आहे हे दर्शवते. आम्ही दोघे एकमेकांना खूप चांगले समजतो आणि एकमेकांना सपोर्ट करतो.