मॉस्को – रशियातील व्यवहार प्रसिद्ध मॅक्डोनाल्ड रेस्टॉरंट शृंखलेलने तीन महिन्यांपूर्वीच थांबवला आहे. मात्र आता नव्या नावाने मॅक्डोनाल्ड पुन्हा एकदा रशियातील खाद्य प्रेमींच्या सेवेत उतरणार आहे. आता या मॅक्डोनाल्डचे नाव आणि मालकही रशियातील असणार आहे.
तीन महिन्यांपूर्वी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अनेक मोठ्या कंपन्या रशियातून बाहेर पडल्या होत्या. त्यापैकी एक मॅक्डोनाल्डही होती. दोन महिन्यांपूर्वी मॅक्डोनाल्डने अधिकृतपणे रशियातून बाहेर पडण्याचे जाहीर केले होते. मॅक्डोनाल्डने 850 रेस्टॉरंट अलेक्झांडर गोव्हर या उद्योजकाला विकून टाकली. या गोव्हर यांनी आता ही आऊटलेट पुन्हा सुरू करायचे ठरवले आहे.
या नव्या रेस्टॉरंटचा लोगो थोडा वेगळा असला, तरी त्यातील “एम’ अक्षर लोकांची नजर खेचून घेत आहे. यापैकी 15 आऊटलेट मडस्कोमध्ये आजपासून सुरू झाली. त्यांचे रशियन नाव “विकुस्नो तोचका’ असे असणार आहे. पूर्वीच्या मॅक्डोनाल्डमधील 62 हजार कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले जाणार असल्याचे नव्या मालकाने म्हटले आहे.