कामशेत – रिंगरोडसाठी पश्चिम भागातील हवेली आणि मावळ तालुक्याने भूसंपादनात आघाडी घेतली आहे. हवेली तालुक्यात पश्चिमसाठी 214 हेक्टर क्षेत्राचे संपादन करावे लागणार आहे. त्यापैकी 108 हेक्टरचे संपादन झाले आहे. तर मावळ तालुक्यात 120 हेक्टरपैकी 67 हेक्टरचे संपादन झाले आहे. त्यामुळे संपादनाच्या तुलनेत मावळ तालुक्यात 55 टक्के तर हवेली तालुक्यात 50 टक्के संपादन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे भूसंपादनासाठी मावळ, हवेली तालुक्याने आघाडी घेतली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येणार्या रिंगरोडसाठी हवेली आणि मावळ तालुक्यात सर्वाधिक भूसंपादन झाले आहे. या रिंगरोडसाठी सुमारे 1600 एकरचे निवाडे जाहीर झाले आहेत. त्यासाठी आतापर्यंत सुमारे 1720 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्व भागातील रिंगरोडसाठी गती येण्याची चिन्हे आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराभोवतीचा रिंगरोड हा मावळ, खेड, हवेली, भोर आणि पुरंदर या पाच तालुक्यांमधून जाणार आहे. या रिंगरोडसाठी पश्चिम भागातून 34 आणि पूर्व भागातील 46 गावांमधील सुमारे 1740 हेक्टर संपादित करावी लागणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराभोवतीचा रिंगरोड हा मावळ, खेड, हवेली, भोर आणि पुरंदर या पाच तालुक्यांमधून जाणार आहे. या रिंगरोडसाठी पश्चिम भागातून 34 आणि पूर्व भागातील 46 गावांमधील सुमारे 1740 हेक्टर संपादित करावी लागणार आहे. पूर्व भागातून 885 हेक्टर आणि पश्चिम भागातील 716 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. पश्चिम भागातील रिंगरोडची रचना बदलल्याने तीन गावांची भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित आहेत. त्यात मुळशी तालुक्यातील कासार आंबोली, हवेली तालुक्यातील प्रयागधाम आणि भोर तालुक्यातील खोपी या गावांचा समावेश आहे.
सक्तीने 370 हेक्टर क्षेत्राचे निवाडे जाहीर
रिंगरोडसाठी पश्चिम भागातील सुमारे 630 हेक्टरचे निवाडे जाहीर करण्यात आले आहेत. त्यापैकी संमतीने 260 हेक्टर तसेच सक्तीने 370 हेक्टर क्षेत्राचे निवाडे जाहीर करण्यात आले आहेत. संमतीने 260 हेक्टर क्षेत्र ताब्यात आले आहे. त्यामुळे 630 हेक्टर क्षेत्राचे म्हणजेच सुमारे 1600 एकर क्षेत्राचे भूसंपादन झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे रिंग रोडच्या पुढच्या प्रक्रियेला गती येण्याची चिन्हे आहेत. 630 हेक्टरसाठी जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 1720 कोटी रुपयांचा निधी वाटप केला आहे.