वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींमधील 316 जागांसाठी 711 उमेदवारांमध्ये लढत झाली. तालुक्यातील 150 मतदान केंद्रावर 81.76 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान बऊर ग्रामपंचायत 93.34 टक्के, तर सर्वात कमी 55.93 टक्के माळवाडी ग्रामपंचायतीमध्ये झाले आहे.
ग्रामपंचायत व कंसात एकूण झालेले मतदान (टक्केवारी)
माळेगाव बुद्रुक (74.03), इंगळून (71.45), खांड (88.97), डाहुली (86.77), कशाळ (84.07), वडेश्वर (76.00), कुसवली (80.70), परंदवडी (85.15), उर्से (86.13), धामणे (85.40), गहूंजे (83.05), सांगावडे (91.61), आंबी (85.42), माळवाडी (55.93), करंजगाव (85.85), गोवित्री (84.89), साई (85.49), घोणशेत (87.00), चिखलसे (92.80), खडकाळा (71.27), कुसगाव खुर्द (83.07), टाकवे बुद्रुक (86.20), साते (86.71), नाणे (87.26), कांब्रे नामा (89.42), वेहरगाव (74.75), ताजे (92.42), मळवली (80.68), पाटण (89.59), कार्ला (82.62), खांडशी (88.83), उकसान (89.81), शिरदे (82.10), तिकोणा (87.50), कोथुर्णे (63.69), वारू (89.85), मळवंडी ठुले (80.26), आपटी (81.16), अजीवली (88.48), मोरवे (80.32), महागाव (88.38), कुसगाव बुद्रुक (73.84), कुरवंडे (74.58), शिवली (86.22), येळसे (88.92), बऊर (93.34), थुगाव (89.90), शिवणे (88.47), आढले खुर्द (92.54).