सांगली – जम्मू- काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील 23 वर्षीय जवान रोमित तानाजी चव्हाण यांना वीरमरण आले. आतंकवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत शोपियां जिल्ह्यातील झेनपुरा येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी चव्हाण शहीद झाले. जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव शहिद रोमित यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शोकाकुल वातावरणात रोमित चव्हाण अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत अंत्यसंस्कार करण्यात आले.
शनिवारी सकाळी झालेल्या चकमकीत रोहित चव्हाण यांच्यासह आणखी एक जवान शहीद झाला होता. रोमितचे पार्थिव काश्मीरमधून पुण्यापर्यंत सैन्यदलाच्या विमानाने आणण्यात आले. आज पहाटे पार्थिव शिगावमध्ये पोहोचल्यानंतर सकाळी साडेआठ वाजता रोमित चव्हाण यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
काश्मीरमधील सोफिया भागात एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करताना शनिवारी सकाळी रोमित चव्हाण यांच्यासह आणखी एक जवान शहीद झाला होता. रोहित चव्हाण यांना गोळी लागल्याचे समजताच सांगली जिल्ह्यातील शिगाव गावावर शोककळा पसरली होती. रोमित हा तानाजी चव्हाण यांचा एकुलता एक मुलगा होता. लहानपणापासूनच सैन्यदलाचे आकर्षण असल्यामुळे वयाच्या १९व्या वर्षीच तो सैन्यदलात भरती झाला होता.