मुंबई : मार्च महिन्यात तीन दिवसीय संपाची हाक सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी दिली आहे. ११ ते १३ मार्च दरम्यान हा तीन दिवसीय संप असेल. या संपामुळे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग सहा दिवस बँक बंद राहतील.
दर पाच वर्षांनी वेतनामध्ये वाढ करण्यात यावी, भात्याना वेतनाशी जोडावे, कौटुंबिक पेन्शनमध्ये सुधारणा करावी, नवीन पेन्शन योजना संपुष्टात आणावी इत्यादी मागण्या बँक कर्मचाऱ्यांच्या आहेत.
दरम्यान या संपापूर्वी १० मार्चला धुलिवंदनानिमित्त सुट्टी असणार आहे. तर १४ मार्चला दुसरा शनिवार आहे. आणि १५ मार्चला रविवार असल्यामुळे सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे बँकाच्या संपामुळे सलग सहा दिवस बँक बंद राहणार आहेत. नागरिकांना सहा दिवसाच्या संपामुळे मनस्ताप सहन करावा लागणार आहे.