वडगाव मावळ, (वार्ताहर) – शिव मल्हार एज्युकेशन ट्रस्ट संचलित प्राईम रोझ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मराठी भाषेचा विकास आणि प्रसाराला चालना मिळावी या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेचे महत्व स्पष्ट केले.
मराठमोळ्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान जागृत करणारे नृत्य सादर केले. तसेच मराठी भाषा विविध कथा, कादंबरी यांनी नटलेली आहे हे शाळेच्या विद्यार्थ्यांनी नाटिकेतून दाखवून दिले. मराठी कविता सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या. कुसुमाग्रज यांच्या प्रती आत्मीयता मुख्याध्यापिका निकिता वधवा यांनी व्यक्त केली.