देहूगाव, ( वार्ताहर) – तीर्थक्षेत्र देहू येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची ७३८ वी पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्री संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन चंद्रकांत बेल्हेकर गुरुजी, मुरलीधर होणावळे, जालिंदर महाराज काळोखे यांच्या हस्ते करण्यात आले. जिजामाता महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन, कीर्तन झाले. प्रवचन, कीर्तन आणि महाप्रसाद वाटपाचे नियोजन सोनार समाज बांधवाच्या वतीने करण्यात आले.
समाजाच्या वतीने श्री संत नरहरी महाराज संस्था स्थापन करण्यात आली असून कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी भरत बेल्हेकर, उपाध्यक्षपदी यतीन घोडेकर, सचिवपदी अनिल टकले, खजिनदारपदी सुधीर खोल्लम, सदस्य म्हणून सागर खोल्लम, भूषण बेल्हेकर, रोहन खोल्लम, वीरेंद्र घोडेकर, मुरलीधर होनावळे, अविनाश निघोजकर, जोत्स्ना खोल्लम, रमेश बेदरकर, समीर दोंदेकर, संतोष निघोजकर, नंदकुमार टकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.