#Ottawa Film Festival | सोलापूरच्या अक्षय इंडीकरचा कॅनडात डंका, ‘स्थलपुराण’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार

पुणे – मराठी दिग्दर्शक अक्षय इंडिकर यास कॅनडातील ‘ओटावा इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2021’मध्ये ‘स्थलपुराण’ या मराठी चित्रपटासाठी सर्वेत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार जाहिर झाला आहे. तर याच चित्रपटासाठी सर्वेत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार नील देशमुख याने पटकावला आहे.

यावेळी बोलताना दिग्दर्शक अक्षय इंडीकर म्हणाले की, ”कॅनडा मधील चित्रपट महोत्सवात मला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार जाहीर झाला आहे माझ्या संपूर्ण टिमचं हे यश आहे हा पुरस्कार मी माझ्या मराठी भाषेला अर्पण करतो” अशा शब्दात भावणा व्यक्त केल्या आहेत.

दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना याआधी बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘क्रिस्टल बेयर’, एशियन न्यु टॅलेंन्ट अवार्ड, नॉमिनेटेड, आशिया खंडातील ऑस्कर मानला जाणारा ‘यंग सिनेमा अवार्ड’, राष्ट्रिय रजत कमल’ यासह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

अक्षय इंडीकर हे नाव चित्रपट सृष्टीसह सिनेरसिकांना आता चांगलेच परिचित झाले आहेत. त्याची मराठीतील पहिली डॉक्यु-फिक्शन फिल्म ‘उदाहरणार्थ नेमाडे’ असो किंवा ‘त्रिज्या’ तसेच ‘स्थलपुराण’सारखे दर्जेदार चित्रपट असोत. अक्षयच्या या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये विविध पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. पुरस्कारांनंतर गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी अक्षय इंडीकर यांची मुलाखतही घेतली होती.

‘ओटावा इंडियन फिल्म फेस्टिवल’चे 22 ते 26 जून या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. ‘स्थलपुराण’मध्ये आठ वर्षांच्या दिघूची कथा आहे. वडील बेपत्ता झाल्यानंतर त्यांना शोधण्यासाठी तो तळमळीने प्रयत्न करतो. पण शेवटी शोध न लागल्याने कोकणात आयुष्याच्या संघर्षासह आजी-आजोबांबरोबर राहायला जातो.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.