पुणे – करोनाच्या संकटामध्ये आपल्या व्यवसायाचा ऑनलाइन प्रेझेन्स किती महत्त्वाचा आहे, हे आपल्या सर्वांनाच कळून चुकले आहे. कारण लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प पडले होते. पण ज्या व्यवसायाचा ऑनलाइन प्रेझेन्स आहे, असे व्यवसाय मात्र व्यवस्थित चालू होते. कारण त्यांनी त्यांचा व्यवसाय ऑनलाइन चालू ठेवून त्यांच्या ग्राहकांच्या गरजा पुरवल्या व ग्राहक टिकवण्यात ते यशस्वी झाले.
आताच्या या डिजिटल वर्ल्डमध्ये प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आणि इंटरनेट असतेच. जगातील कोणतीही माहिती युजरला एका क्लिकवर काही सेकंदात उपलब्ध होते. मग व्यावसायिक कसे मागे राहतील? यासाठी प्रत्येक व्यावसायिक आपला व्यवसाय ऑनलाइन वाढवण्याच्या मागे लागला आहे.
यासाठीच गुगलने “गुगल माय बिझनेस’ हा नवीन प्लॅटफॉर्म व्यावसायिकांसाठी उपलब्ध केला आहे. गुगल हे सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे, ज्याचे कोट्यवधी युजर्स आहेत. मग अशा गुगलवर आपण आपला बिझनेस ऑनलाइन आणला तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल.
तुम्ही जर तुमचा बिझनेस गुगल माय बिझनेसवर रजिस्टर केला तर, जेव्हा ग्राहक तुम्हाला सर्च इंजिनवरून शोधतील, तेव्हा तुमचे गुगल माय बिझनेस अकाउंट तुम्हाला सर्च रिझल्ट्समध्ये दाखवण्यास मदत करते; तेही अगदी मोफत! विशेष म्हणजे रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नसते.
छोट्या व्यावसायिकांसाठी तर गुगल माय बिझनेस ही गुगलकडून मिळालेली सोनेरी पर्वणीच आहे. जर तुम्ही किराणा मालाचे छोटे दुकान, हॉटेल, सलून, मोबाइल शॉप किंवा टेलरिंग दुकान चालवणारे असाल तर तुम्ही नि:संकोचपणे तुमचा बिझनेस ऑनलाइन रजिस्टर करू शकता.
गुगल माय बिझनेसवर रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्ही ग्राहकांना गुगल सर्च व गुगल मॅपवर सहज सापडता. त्यातून अनेक नवीन ग्राहक तुमच्यापर्यंत पोहोचतात.
गुगल माय बिझनेस अकाउंटमुळे तुमच्या बिझनेसचा लोकल सेल वाढण्यास मदत होते. जर तुमच्या व्यवसायाची वेबसाइट असेल तर तुम्हाला टॉप रिझल्टसमध्ये स्थान मिळू शकते.
गुगल माय बिझनेसवर रजिस्ट्रेशनचे फायदे
1. तुमच्या उत्पादन किंवा सेवांसंबंधी संभाव्य ग्राहकाने जर काही शब्द (कीवर्ड) गुगलवर सर्च केले, तर तुमच्या सेवेबद्दल तसेच व्यवसायाचा पूर्ण तपशील ग्राहकांना प्राप्त होतो.
जर तुमचे बिलिंडग मटेरियल सप्लायचे दुकान असेल व ग्राहकांनी गुगल सर्चमध्ये “बिल्डिंग मटेरियल शॉप निअर मी’ असे टाकले तर सर्च रिझल्टमध्ये तुमच्या शॉपच्या पूर्ण डिटेल्स मिळतील. कोणतेही शुल्क न घेता, गुगल तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचवतो.
- आपले ग्राहक आपले उत्पादन आणि सेवांबद्दल आपल्या गुगल माय बिझनेस पेजवर त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवू शकतात आणि याचा उपयोग आपल्याला आणखी ग्राहकांचा विश्वास संपादन करून व्यवसाय वाढविण्यासाठी होतो.
-
आपल्या व्यवसायाची वेबसाईट असेल तर उत्तमच; परंतु जर नसेल तर गुगल माय बिझनेस तुम्हाला तीही सुविधा पुरवत आहे. गुगल माय बिझनेस अकाउंटवरून आपण आपल्या व्यवसायाची सिंगल पेज वेबसाइट बनवू शकतो, तीही अगदी मोफत व लाईफलॉंग.
हा एक अतिशय महत्त्वाचा फायदा आहे. त्यामुळे आजच गुगल माय बिझनेसवर आपला व्यवसाय रजिस्टर करा आणि यशाची उंच शिखरे गाठा.
– श्वेता अक्षय ढोरे