Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा कुणबी (Maratha Kunbi), कुणबी मराठा (Kunbi Maratha) नोंदी तपासल्या असून त्याची माहिती आता समोर येत आहे. त्यात पूर्वीही ज्यांना आरक्षणाचा (Maratha Reservation) लाभ होत होता त्यांचाही तपास करण्यात आला. त्यानुसार राज्यात गेल्या 15 दिवसांत 29 लाख 1 हजार 121 नोंदी सापडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठवाड्यापासून कुणबी नोंदी तपासण्यास सुरूवात झाली. मात्र मराठवाड्या सर्वात कमी नोंदी आढळल्या असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक नोंदी विदर्भात आढळल्या आहेत. मंत्रालयात आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रात सापडलेल्या बहुतेक नोंदी नव्या आहेत. सांगलीत प्रमाणपत्र वाटपासाठी खास संकेतस्थळ आणि कार्यालय तयार करण्यात आले आहे.
आतापर्यंत सापडेल्या नोंदींमध्ये विदर्भात सर्वाधिक तर ज्या मराठवाड्यापासून कुणबी नोंदी (Marathwada Kunbi) तपासण्यास सुरूवात झाली. मात्र मराठवाड्या सर्वात कमी नोंदी आढळल्या आहेत. मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून आठ कोटी 99 लाख 33 हजार 281 नोंदींपैकी कुणबी- मराठा जातीच्या 29 लाख एक हजार 121 नोंदी सापडल्या आहेत. सर्वात जास्त कुणबी नोंदी या विदर्भामध्ये सापडल्या आहेत. विदर्भात आतापर्यंत 13 लाख ३ हजार 885 नोंदी सापडल्या आहेत.
राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात कमी कुणबी नोंदी या कोकणात सापडल्या आहेत. कोकणात जवळपास साडेपाच लाख नोंदी तपासल्याानंतर सर्वात कमी 118 कुणबी-मराठा नोंदी सापडल्या आहेत. मराठवाड्यातल्या सगळ्या नोंदी नव्याच आहेत. मंत्रालयात आकडेवारी संकलीत करण्याचे काम सुरू आहेत.
ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मागासवर्ग आयोगाने नव्याने सर्वेक्षण करताना केवळ मराठा जातीचा अभ्यास करावा, ओबीसीत असलेल्या मराठा समुहातल्या सहा जातींचे सर्वेक्षण करू नये असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करताना कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी या सहा जातीना वगळून मराठा समाज मागास आहे का याचा अभ्यास करावा. या सहा जाती आधीच ओबीसी समाजामध्ये आहे. त्यामुळे ओबीसीमध्ये असलेल्या जातींना सोबत घेऊन मराठा समाजाचा मागासलेपण कसे सिद्ध होईल? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.