Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) प्रयत्न करत आहे. यासाठी त्यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची डेडलाइन देण्यात आली आहे.
दरम्यान, येत्या ८ डिसेंबर रोजी जरांगे पाटील यांची नांदेड जिल्ह्यातील कंधारमध्ये सभा होणार आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी चौथ्या टप्याच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. आणि या अनुषंगाने त्यांची नांदेड जिल्ह्यात ७ आणि ८ डिसेंबर रोजी सलग अश्या पाच सभा होणार आहेत.
दरम्यान, मराठा समाजाच्या या लढ्याला आता मुस्लिम समाजाने पाठिंबा दर्शविला असल्याचं दिसून येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला जागा कमी पडू नये म्हणून कब्रस्तानासाठी आरक्षित २० गुंठे असलेली जागा देण्याचा निर्णय कंधारच्या मशीद यमना कब्रस्तान कमेटीने घेतला आहे.
येत्या ८ डिसेंबर रोजी जरांगे पाटील यांची शिवाजी मैदान येथे ही सभा होणार आहे. मुस्लिम समाजाने घेतलेल्या या निर्णयाचे मराठा समाजाकडून स्वागत केलं जात आहे.
८ डिसेंबर नांदेड शहरासह, लोहा तालुक्यातील मारतळा, नायगाव आणि कंधार या ठिकाणी जरांगे पाटलांची सभा होणार आहे. सध्या या सभेची जोरदार तयारी देखील सुरु झाली आहे.