Realme GT 6T Phone Details । Realme ने नुकतंच आपल्या Realme GT 6T फोनच्या लॉन्च तारखेबद्दल माहिती दिली. कंपनीच्या म्हणण्यानुसार हा फोन 22 मे रोजी लॉन्च होईल. लॉन्च होण्याआधीच कंपनीने फोनच्या फीचर्सची माहिती देणे सुरू केले आहे.
चिपसेटपासून फोनच्या बॅटरीपर्यंत अनेक माहिती समोर आली आहे. हा फोन एक गेमिंग फोन असणार आहे, जो 5500 mAh बॅटरीसह आणला जाईल. यासोबतच यामध्ये 120w फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिसेल.
Realme ने सोशल मीडियावर माहिती शेअर केली…
Realme च्या या फोनमध्ये तुम्हाला Snapdragon + Gen 3 प्रोसेसर मिळणार आहे, ज्याचा AnTuTu स्कोर 1.5 मिलियन आहे. Realme चा हा मिड-बजेट स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर उपलब्ध करून दिला जाईल.
Realme च्या या फोनमध्ये तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स मिळणार आहेत. हा फोन नवीन डिझाईन मध्ये येणार आहे, जो Realme चा रोबोटिक फोन असल्याचे बोलले जात आहे.
A truly turbulent #TopPerformer is on the way to steal the spotlight with its premium nano mirror design!
You can win the #realmeGT6T by sharing your excitement in 6 words. Use #realmeGT6T and tag 2 friends.
Launching on the 22nd May, 12 noon!
know more: https://t.co/EvpA5diVHA pic.twitter.com/9moKXZoWJc— realme (@realmeIndia) May 13, 2024
तुम्हाला हे फीचर्स Realme GT 6T फोनमध्ये मिळू शकतात –
Realme च्या या फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, तुम्हाला 6.78 इंच 1.5K LTPO AMOLED डिस्प्ले मिळू शकतो, जो 6,000 nits पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल. फोन 16GB LPDDR5x रॅम आणि 512GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजला सपोर्ट करू शकतो.
या Realme फोनच्या मागील बाजूस तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यासोबतच हा फोन Android 14 वर आधारित Realme UI 5.0 सह लॉन्च केला जाईल.
फोनमध्ये 50MP मुख्य आणि 50MP दुय्यम कॅमेरा असेल. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये तुम्हाला 32MP कॅमेरा मिळू शकतो.