Manoj Jarange-Patil : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिल्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे तिसऱ्या टप्प्यात पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याला 15 नोव्हेंबरपासून म्हणजेच उद्यापासून सुरुवात होणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा तिसरा टप्पा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वांगी गावातुन सुरु आहे. त्यासाठी उद्या संध्याकाळी ७ वाजता होणार पहिली सभा पार पडणार आहे. वांगी येथे १०० एकर जागेवर ही भव्य सभा होणार असून या सभेची जोरदार तयारी करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगेंनी आपल्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 15 ते 23 नोव्हेंबर असा राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार असून एकूण 6 टप्प्यात हा दौरा असणार आहे.
मनोज जरांगे यांनी आपल्या या दौऱ्यात जरांगे हे ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहे. सोबतच 1 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे.