नवी दिल्ली : दिल्लीतील कथित दारु घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सध्या तिहार तुरुगांत न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र असे असताना सिसोदिया यांनी चक्क तुरुंगातून होळीनिमित्त एक ट्विट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी केलेल्या या ट्विटमुळे भाजपकडून आपवर निशाणा साधला आहे. तसेच सिसोदिया तुरुंगात मोबाईल कसे काय वापरत आहेत? असा सावल देखील उपस्थित करण्यात आला आहे.
सिसोदिया यांनी या ट्विटमध्ये त्यांनी “आत्तापर्यंत ऐकलं होतं की देशात शाळा सुरु होतात तेव्हा तुरुंग बंद होतात. पण आता या लोकांनी तर देशात शाळा सुरु करणाऱ्यांनाच तुरुंगात बंद करणं सुरु केलं आहे.”असे म्हणत केंद्र सरकारवर टीका केली आहे.
आज तक सुना था कि देश में स्कूल खुलते हैं तो जेल बंद होते है; लेकिन अब इन लोगो ने तो देश में स्कूल खोलने वालों को ही जेल में बंद करना शुरू कर दिया।#ManishSisodia
— Manish Sisodia (@msisodia) March 8, 2023
दरम्यान, भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी सिसोदियांच्या ट्विटला उत्तर देताना, ‘तुरुंगात मनिष सिसोदिया यांच्याकडं फोन आहे का?’ कारण २६ फेब्रुवारीला सीबीआने ताब्यात घेतल्यानंतर आत्तापर्यंत सिसोदिया यांनी एकही ट्विट केले नव्हते. यानंतर त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन होळीच्या दिवशी संध्याकाळी पहिल्यांदाच ट्विट करण्यात आले. यामुळं राजकीय गदारोळ माजला आहे.
जेल में मनीष सिसोदिया के पास फ़ोन ? https://t.co/7wKnAJWBea
— Parvesh Sahib Singh (@p_sahibsingh) March 9, 2023
सिसोदियांच्या ट्विटमुळे भाजपने त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पण सिसोदियांचे हे ट्विटर हँडल त्यांची सोशल मीडिया टीम किंवा त्यांची पत्नी हाताळत असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्हीपैंकी कोणी एकाने हे ट्विट करण्यात आले आहे. पण यावर आम आदमी पार्टीकडून अद्याप कुठलंही स्पष्टीकरण आलेले नाही.