नवी दिल्ली – मणिपूरममध्ये भाजप आमदारांच्या बैठकीत एन बीरेन सिंह यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड झाली आहे. त्यामुळे लागोपाठ दुसऱ्यांदा बीरेन सिंह मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. दरम्यान नवी दिल्लीतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी फेमोद सावंत यांच्या नावावर भअजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने शिक्कामोर्तब केले आहे.
मणिपूरमधील आमदारांच्या भाजप आमदारांच्या बैठकीत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि किरेन रिजिजू पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत एन. बीरेन सिंह यांची विधिमंडळाचे नेते म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? याचा सस्पेन्स संपला आहे.
भाजप नेतृत्वाने प्रमोद सावंत यांच्याकडे मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रमोद सावंत पुन्हा राज्याची सूत्रे हाती घेऊ शकतात. सावंत 24 मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, असे सूत्रांनी म्हटले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने 40 पैकी 20 जागा जिंकल्या आहेत. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
मी शनिवारी दिल्लीला गेलो होतो. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी भाजपचे निरीक्षक उद्या येथे येणार आहेत. शपथविधी सोहळ्याबाबतही उद्या संध्याकाळी निर्णय होणार आहे, असे गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी सांगितले.