मेलबर्न – टेनिस, क्रिकेट व पुन्हा टेनिस असा प्रवास केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अव्वल महिला टेनिसपटू अश्ले बार्टी हीने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहिर केली आहे. अश्लेने 3 ग्रॅंडस्लॅम विजेतेपदेही मिळवली होती. तसेच तीने त्याचवर्षी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसच्या महिला एकेरीचेही विजेतेपद पटकावले होते. बार्टीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवरुन आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहिर केला.
हा निर्णय घेणे कठिण होते. हा निर्णय योग्य आहे की अयोग्य याचा विचार मी करत नाही हा निर्णय माझ्यासाठी आहे आणि या बाबत मी बऱ्याच काळापासून विचार करत होते. गेले वर्ष माझ्यासाठी अत्यंत चांगले गेले. विंम्बल्डन जिंकणे हे माझे स्वप्न होते. ते पूर्ण झाल्यावर मला ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपदही खुणावत होते. त्याच्यावर नाव कोरल्यानंतर आता मला वेगळी स्वप्ने खुणावत आहेत, असे बार्टीने सांगितले.
टेनिसने मला खूप काही दिले. मात्र आता माझे शरीर याच्या पुढे साथ देणार नाही. त्यामुळेच मी निवृत्तीचा निर्णय घेतला. आता मला इतर स्वप्ने पूर्ण करायची आहेत. आता मला जगभर प्रवास करायचा नाही, कुटुंबापासून दूर रहायचे नाही मला घरापासून दूर रहायचे नाही आहे, असेही तीने सांगितले.
बिगबॅशमध्ये चमकली
बार्टीने वयाच्या 16 व्या वर्षी टेनिसमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला होता. 2011 साली तिने ज्युनिअर मुलींच्या एकेरी गटाचे विंम्बल्डन विजेतेपद पटकावले होते. मात्र त्यानंतर बार्टीने ब्रेक घेत क्रिकेटची बॅट हाती घेतली. ऑस्ट्रेलियातील महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये चमक दाखवली. ती महिलांच्या पहिल्याच बीग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हीट कडून खेळली होती. बार्टीने क्रिकेटचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते. मात्र, 2016 साली तीने पुन्हा क्रिकेट सोडून टेनिसवर लक्ष केंद्रीत केले.