झांसी – उत्तरप्रदेशातील झांसी जिल्ह्यात ट्रॅक्टर ट्राॅली उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अकरा जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार मुले आणि सात महिलांचा समावेश असल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना झांसी जिल्ह्यातील चिरगाव ठाणे हद्दीत भांडेर रोडवर शुक्रवारी दुपारी घडली.
एसएसपी शिवहरि मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडोखर येथून 30 नागरिकांना घेऊन ट्रॅक्टर एरचकडे जात होते. यावेळी भांडेर येथे समोरून अचानक आलेल्या गाईला वाचवण्याच्या प्रयत्नान चालकाचा ट्र्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि अनियंत्रित ट्रॅक्टर बाजूला असलेल्या शेतात जाऊन उलटले. या दुर्घटने अकरा जणांचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत.