नांदुर (ता. दौंड)- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी “स्वच्छ भारत दिवस २०२३” च्या निमित्ताने २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असून, दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी देशभरात प्रत्येक गावात, शहरात व्यापक स्वरूपात “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आले.
स्वच्छता ही सेवा २०२३ ची थीम “कचरामुक्त भारत” आहे. यामध्ये “दृष्यमान स्वच्छता” व यावरती लक्ष केंद्रित केले असून, ग्रामीण भागातील आदी सार्वजनिक ठिकाणी व ग्रामीण भागात ही संयुक्त मोहीम राबविण्यात आले. याबाबत सविस्तर निर्देश सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
दौंड तालुक्यातील गावात गावकऱ्यांच्या सहभागातून श्रमदान करण्याचे ठिकाण प्रत्येक गावात निश्चित करण्यात आले असून प्रत्येक गावात एक ऑक्टोबर रोजीची महाश्रमदान मोहीम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी एक दिवसातील एक तास आपल्या गावाच्या स्वच्छतेसाठी दिला. तसेच आपल्या गावात राबविण्यात येणाऱ्या महाश्रमदान मोहीमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले गाव, गावाचा प्रत्येक परिसर स्वच्छ करण्याचे आवाहनही माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन म्हेञे यांनी केले आहे.