मायणी (प्रतिनिधी)- पुण्याच्या श्री गुरुदेव दत्त अध्यात्मिक विकास सेवा केंद्राच्या विद्यमाने विखळे (ता. खटाव) येथे गुरुवार दि. २५ एप्रिल रोजी महासत्संग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र परिवाराच्यावतीने दिली.
दैनंदिन मानवी जीवनातील समस्या, दत्तप्रणाली आणि त्यांच्या अवतार कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य, दैवी सकारात्मक ऊर्जा मार्गदर्शन, मानवी जीवनातील विविध समस्यांवर समाधान, राष्ट्रकल्याणार्थ समस्त देवतांची सेवा व त्यावर मार्गदर्शन, मानवी जीवनातील विविध समस्यांचे समाधान, राष्ट्र कल्याणार्थ समस्त देवतांची सेवा,
मानवी जीवनातील कुलदेवी, कुलदैवत व पितरांचे महत्त्व, बाल संस्कार आणि युवा संस्कार आधारित अध्यात्मिक मार्गदर्शन, भारतीय अध्यात्मिक संस्कृतीमध्ये ध्यानाचे महत्त्व, सनातन हिंदू धर्म संस्कृतीचे महत्त्व, भारतीय संस्कृतीमधील चार पुरुषार्थ यांचे मानवी जीवनातील महत्व याविषयी महाससत्संग मेळाव्यात मार्गदर्शन होणार आहे.
मेळाव्यात सकाळी ६ ते १० भैरव चंडी, सकाळी १० ते ११ श्री स्वामी समर्थ महाराजांचा पालखी सोहळा, दुपारी १२. ३० ते २ अविनाश दादा यांचे मार्गदर्शन, दुपारी २ ते ४महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.