अमेरिकन सैन्याला महाराष्ट्र पुरवणार दारुगोळा रसद

पुणे – अमेरिकन सैन्याच्या रायफल्स, बंदुकांसारख्या छोट्या शस्त्रांमध्ये वापरण्यात येणारा दारूगोळा आता महाराष्ट्रातून पुरवला जाणार आहे. राज्यातील वरणगाव फॅक्ट्री येथे निर्माण केला जाणारा “नाटो एम वन नाइन थ्री’ प्रकारातील दारुगोळा लवकरच अमेरिकेत निर्यात केला जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात हा निर्यात व्यवहार पूर्ण होईल, अशी माहिती आयुध निर्माणी कारखाना मंडळाने दिली आहे.

 

देशातील आयुध निर्माणी कारखान्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी कारखाना मंडळाने निर्यातवाढीकडे भर दिला आहे. याच अनुषंगाने विविध देशांना त्यांच्या मागणीनुसार देशातील विविध कारखान्यांकडून दारूगोळा पुरवठा केला जात आहे.

 

अमेरिकेसाठी निर्यात केला जाणारा 5.56-45मिमी नाटो एम वन नाइन थ्री बॉल ऍम्युनिशन हादेखील याच प्रयत्नांचा एक भाग असणार आहे. मंडळाच्या वरणगाव येथील कारख्यान्यात या दारूगोळ्याची निर्मिती केली जाते. रायफल्स, बंदुका यासारख्या छोट्या शस्त्रांमध्ये या प्रकारचा दारूगोळा वापरला जातो.

यापूर्वीदेखील मंडळाच्या खडकी येथील कारखान्यांतून “टीटीई पावडर’ हा दारूगोळ्याचाच भाग असलेली पावडर अमेरिकेला निर्यात केली आहे. कारखान्याला मिळालेल्या या संधीबाबत संरक्षण उत्पादन क्षेत्रातून आनंद व्यक्त केला जात असून, पुढील काळात स्वदेशी मालाची परदेशात निर्यात वाढावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.