मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज दिनांक तीन मार्चपासून मुंबई येथे प्रारंभ होत आहे. या अधिवेशनामध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार असल्याने या अधिवेशनाचे महत्त्व जास्त आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये झालेल्या विविध प्रकारच्या अधिवेशनावर नजर टाकली तर या अधिवेशनात काही भरीव घडेल की नाही, याबाबत शंका निर्माण होत आहे. अर्थात, अर्थसंकल्प सादर करून मंजूर करून घेण्याचा उपचार जरी पार पाडला जाणार असला तरी हे अधिवेशन शांततेच्या आणि सौहार्दाच्या वातावरणात पार पडेल की नाही याबाबत आतापासूनच शंका येऊ लागली आहे.
Maharashtra Budget Session Live:
– ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर सर्वात आधी विधानभवनात पोहचले
– विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांचे आंदोलन सुरु, नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक
– विधानभवनाच्या पायऱ्यांवरील आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर सहभागी
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधान भवनात आगमन
– ”आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. यंदाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन खऱ्या अर्थानं जनहितार्थ ठरेल; महाविकासआघाडी सरकारच्या वतीनं सर्वसमावेशक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही देतो.” – उपमुख्यमंत्री अजित पवार
आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. यंदाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन खऱ्या अर्थानं जनहितार्थ ठरेल; महाविकासआघाडी सरकारच्या वतीनं सर्वसमावेशक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही देतो. pic.twitter.com/ChEmWuXvE6
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 3, 2022
– मुख्यमंत्री विधानभवनात पोहचले, आदित्य ठाकरेंनी केलं वाहनाचं सारथ्य
-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल, उपमुख्यमंत्र्यांनी केले स्वागत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी विधानभवन येथे आगमन झाले. आजपासूनच विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.
-राज्यपाल विधान भवन परिसरात दाखलराज्यपालांचं अभिभाषण सुरु
-राज्यपाल येताच छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणा राज्यपालांनी भाषण थांबवलं, अभिभाषण पटलावर ठेवत राज्यपाल थांबले, भाषण न करताच राज्यपाल निघाले
-आमदार संजय दौंड यांनी शीर्षासन करुन राज्यपालांचा निषेध केला
-विधानसभा कामकाजाला सुरुवात, भाजप आक्रमक, नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी
-लता मंगेशकर यांच्या शोकप्रस्तावादरम्यान विधानपरिषदेतून भाजपचा सभात्याग
-विधानपरिषदेत प्रविण दरेकरांसह इतर भाजप सदस्य परतले
– सत्तेत येण्यासाठी भाजपाचे लोकं हापापले आहेत – यशोमती ठाकूर
– विधान परिषदेत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, पद्मभूषण विजेते राहुल बजाज यांच्या शोकप्रस्तावानंतर दिवसभराचं कामकाज स्थगित, उद्या सकाळी ११ वाजता सभागृहाचं कामकाज सुरू होणार