पॅरिस – फ्रान्समध्ये महत्वाकांक्षी निवृत्तीवेतनाबाबतचे विदेयक संसदेमध्ये मतदान न घेताच मंजूर करण्यात आले आहे. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी हे धाडसी पाऊल उचलले आहे. या विधेयकावर संसदेत मतदान होण्याच्या काही मिनिटे आगोदर हा निर्णय घेण्यात आला. हे विधेयक संसदेत मंजूर होण्याची सरकारला कोणतीही खात्री वाटत नव्हती, त्यामुळे अध्यक्षांनी आपल्या अधिकारात हे विधेयक संसदेच्या कनिष्ठ सभागृहात मंजूर करून घेण्याचा निर्णय घेतला.
या विधेयकामुळे फ्रान्समदील निवृत्तीचे वय 62 वरून 64 होणार आहे. मॅक्रॉ हे पुन्हा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी या महत्वाकांक्षी विधेयकाला सर्वाधिक प्राधान्य दिले होते. मात्र निवृत्तीचे वय वाढवल्यामुळे रोजगाराच्या संधी कमी होणार आहेत. हे लक्षात घेऊन फ्रान्समध्ये जानेवारी महिन्यापासून संप आणि आंदोलने सुरू झाली आहेत.
Turkey floods : भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या तुर्कीयेत आता पूराचे संकट; आतापर्यंत 14 जणांचा…
आता मॅक्रॉ यांनी स्वतःच्या अधिकारात निवृत्तीचे वय वाढवल्यामुळे निवृत्तीवेतनाचा सरकारवरील ताण कमी होणार आहे. मात्र सरकारने चर्चेचा मार्ग बंद ठेवल्यामुळे सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे.