मु. सा. काकडे महाविद्यालयात माहिती व्यवस्थापन व वेबसाईट डेव्हलपमेंट विषयांवर कार्यशाळा

सोमेश्वरनगर – मु. सा. काकडे महाविद्यालयात डेटा मॅनेजमेंट (माहिती व्यवस्थापन) या
विषयावर सोमवार दि.९ रोजी महाविद्यालयात कार्याशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्याशाळेत मार्गर्शन करण्यासाठी पुणे येथील इनपॉड्स टेक्नॉलॉजिसचे संचालक अजय भागवत हे उपस्थित होते. सध्या शिक्षणव्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल होत असून या बदलाबरोबरच शिक्षण संस्थांना माहिती व्यवस्थापनामधील बदल स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. नॅकच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार महाविद्यालयातील माहितीचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यासाठी नवनवीन सॉफ्टवेअर्स महाविद्यालयाने घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे यांनी नॅकच्या नवीन बदललेल्या मार्गदर्शक तत्वांची माहिती सर्वांना देऊन यापुढे सर्वांनी एकूण नॅक प्रकियेबाबत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या.

तसेच, बुधवार दि. ११ मार्च रोजी वेबसाईट डेव्हलपमेंट (संकेतस्थळ विकास) कार्यशळेचे
आयोजन करण्यात आले होते. बदलत्या शिक्षण पद्धतीबरोबरच महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला नॅकच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये विशेष महत्व दिल्याने, महाविद्यालयांना वेबसाईटमध्ये बदल करणे गरजेचे झाले आहे, असे मत पुण्यातील व्हाईटकोड टेक्नॉलॉजी सोल्यूशस कंपनीचे संचालक घनश्याम ननावरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात व्यक्त केले. या कार्याशाळेसाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून निर्गमित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे उपस्थित होते. नॅकच्या नवीन मार्गदर्शक तत्वात वेबसाईट ही महाविद्यालयाचा आरसा असून अनेक
गोष्टींची खात्री वेबसाईटवरील माहिती, फोटो, अहवाल, समित्या व महाविद्यालयातील विविध उपक्रम या सर्वांची खात्री होणार आहे. म्हणून महाविद्यालयाला वेबसाईट रोजच्या रोज अद्ययावत करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजन बी.बी.ए (सी.ए.) विभागाचे विभागप्रमुख प्रा. रजनीकांत गायकवाड यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार आयक्यूएसी समन्वयक डॉ. संजू जाधव यांनी व्यक्त केले. डॉ. जगन्नाथ साळवे, प्रा. रविकिरण मोरे, प्रा. जवाहर चौधरी, डॉ. देविदास वायदंडे, प्रा. नारायण राजूरवार, डॉ. निलेष आढाव, प्रा. संतोष शेळके, डॉ. श्रीकांत घाडगे, डॉ. दत्तात्रय डुबल, डॉ. बाळासाहेब मरगजे आदी कार्यक्रमास उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.