Legends Cricket Trophy 2024 : लिजेंड्स क्रिकेट ट्रॉफीचा दुसरा सीझन सुरू होण्यासाठी काहीच दिवस राहिले आहे. 8 मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा 12 दिवस चालणार असून त्यातील अंतिम सामना 19 मार्च रोजी होणार आहे. या लीगच्या पहिल्या सत्रात दिग्गज खेळाडूंनी जगभरातील क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली होती.
यावेळीही 7 संघांमध्ये लढत होणार असून यामध्ये ख्रिस गेल, युवराज सिंग, हरभजन सिंग आणि शाहिद आफ्रिदीसारखे दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहेत. या लीगचे सर्व सामने श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर खेळवले जातील. लेजेंड्स क्रिकेट ट्रॉफीमध्ये कोणते खेळाडू कोणत्या संघाकडून खेळताना दिसणार आहेत हे जाणून घेऊया.
लिजेंड्स क्रिकेट ट्रॉफी 2024 संघ….
कोलंबो लायन्स : ख्रिस गेल (कर्णधार), रॉस टेलर, बेन डंक, डॅरेन ब्राव्हो, जेसी रायडर, असगर अफगाण, नवरोज मंगल, यासिर शाह, झुल्फिकार बाबर, दौलत झदरन, रॉबर्ट फ्रायलिंक, मुहम्मद इरफान, खालिद उस्मान, खवर अली.
दिल्ली डेव्हिल्स : सुरेश रैना (कर्णधार), शाहिद आफ्रिदी, जेकब ओरम, अंबाती रायुडू, सोहेल तन्वीर, मॅट प्रायर, अनुरीत रिंग, प्रवीण गुप्ता, समन जयंता, इशान मल्होत्रा, प्रवीण तांबे, इक्बाल अब्दुल्ला, नागेंद्र.
दुबई जायंट्स : हरभजन सिंग (कर्णधार), शॉन मार्श, रिचर्ड लेव्ही, सोलोमन मीरे, थिसारा परेरा, जोनाथन कार्टर, सॅम्युअल बद्री, सुरंगा लकमल, सचित पाथीराना, दिनेश रामदिन, फिडेल एडवर्ड्स, गुरकीरत मान, व्हर्नन फिलँडर, सौरभ तिवारी, बेनग .
कँडी सॅम्प आर्मी : आरोन फिंच (कर्णधार), स्टुअर्ट बिन्नी, जो बर्न्स, उपुल थरंगा, युसूफ पठाण, इरफान पठाण, सेक्कुगे प्रसन्ना, नुवान कुलसेकरा, जोनाथन वेल्स, केविन ओब्रायन, टिनो बेस्ट, क्रिस्टोफर एमपोफू, लियाम प्लंकेट.
न्यूयॉर्क सुपरस्टार स्ट्रायकर्स : युवराज सिंग (कर्णधार), डॅन ख्रिश्चन, इसुरु उडाना, चॅडविक वॉल्टन, जेरोम टेलर, रिकार्डो पॉवेल, अल्विरो पीटरसन, नुवान प्रदीप, असाला गुणरत्ने, चमारा कपुगेदरा, राहुल शर्मा, लाहिरू थिरिमाने.
पंजाब रॉयल : तिलकरत्ने दिलशान (कर्णधार), मार्टिन गप्टिल, नमन ओझा, मिगुएल कमिन्स, दिलशान मुनावीरा, अब्दुल रज्जाक, मॉन्टी पानेसर, असद शफीक, जेव्हॉन सेअरल्स, फिल मस्टर्ड, नील ब्रूम, सिद्धार्थ त्रिवेदी, उपुल इंद्रसिरी.
राजस्थान किंग्स : रॉबिन उथप्पा (कर्णधार), लेंडल सिमन्स, इम्रान ताहिर, अँजेलो परेरा, श्रीशांत, ऍशले नर्स, हॅमिल्टन मसाकादजा, चतुरंगा डी सिल्वा, परविंदर अवाना, पीटर ट्रेगो, हमीद हसन, बिपुल शर्मा, राजेश बिश्नोई.
दरम्यान, लिजेंड्स क्रिकेट ट्रॉफीच्या आयोजकांनी अधिकृत घोषणा करताना सांगितले की, लीगचा अधिकृत प्रसारण भागीदार स्टार स्पोर्ट्स असेल. हे सामने Disney+ Hostar वर थेट पाहता येतील. हे सामने स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरही पाहता येतील.