Lonavla Pune Cycle race – स्व. यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त संजय बालगुडे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ३५ वी लोणावळा पुणे सायकल स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. प्रमुख पाहुणे प्रमोद गायकवाड, राजू गवळी, मयूर काकडे व संजय बालगुडे यांच्या उपस्थितीत सकाळी १०. २५ मिनिटांनी हिरवा झेंडा दाखवून सायकल स्पर्धा आरंभ करण्यात आली. पुण्यात बालेवाडी येथे ११. ४६ मिनिटांनी सायकल स्पर्धा समाप्त झाली. ओंकार खातसे यांनी १ .२१ मिनिटात सायकल स्पर्धा संपवून पहिला क्रमांक पटकाविला.
चुरशीची लढत देत केदार पवार याने १.२३ मिनिटात स्पर्धा संपवून दुसरा क्रमांक पटकाविला तर तिसऱ्या क्रमांकावर करण गावडे यांनी १.२४ मिनिटात स्पर्धा पूर्ण केली. पहिल्या क्रमांकाचे ओंकार खातसे यांनी सुरवाती पासून आघाडी घेतली होती तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे स्पर्धक मध्ये देहूरॊड च्या पुढे प्रचंड चुरशीची लढत दिसून आली.
बालेवाडी येथील बालवडकर महाविद्यालय येथे प्रमुख पाहुणे डॉ. सागर बालवडकर ( सचिव, बालवाडकर महाविद्यालय ) यांच्या हस्ते व संजय बालगुडे, अनिल पायगुडे यांच्या उपस्थितीत पहिला क्रमांक खेळाडू ओंकार खातसेला प्रशस्तीपत्रक व रोख रुपय ५०००/- देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी केदार पवार याला प्रशस्तीपत्रक व रोख रुपय ३०००/- देऊन सन्मानित केले.
तिसऱ्या क्रमांकाचे करण गावडे यांना प्रशस्तीपत्रक व रोख रुपय १५००/- देऊन सन्मानित करण्यात आले. ५ उत्तेजनार्थ यांना प्रत्येकी ५००/- रोख व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. भरत मारवाडी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अनिल पायगुडे यांनी सर्वांचे आभार मानले. या ३५ व्या लोणावळा पुणे सायकल स्पर्धेचे आयोजन संजय बालगुडे यांनी केले.