लोणावळा, दि. 20 – लोणावळा सहकारी बॅंकेच्या 2023 ते 2028 या पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक येत्या रविवारी (ता. 26) होत आहेत. बॅंकेच्या 12 जागांसाठी 16 अर्ज आले आहेत.वीस वर्षांमध्ये बॅंकेच्या इतिहासात पहिल्यांदाच संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. केवळ एक जागा बिनविरोध झाली आहे. रविवारी सकाळी नऊ ते पाच या वेळेत मतदान होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी बॅंकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
बॅंकेच्या लोणावळ्यासह, पुणे, कामशेत, चिंचवड, तळवडे, थेरगाव व राजगुरुनगर शाखा आहेत. या शाखांतील सहा हजार सभासद मतदानाचा हक्क बजावतील.
बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष मुकुंद शहा यांच्यासह विद्यमान संचालक मंडळातील एकूण 12 सदस्य रिंगणात आहे. अनुसूचित जाती जमाती गटातून सुनील लक्ष्मण गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.