Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
यात नागपूरमधील 53 पैकी 26, भंडारा-गोंदियामधील 40 पैकी 22, गडचिरोली-चिमूरमधील 12 पैकी 12, चंद्रपूरमधील 35 पैकी 15 आणि रामटेक लोकसभा मतदार संघात 41 पैकी 35 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
दरम्यान, पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 30 मार्च 2024 ही असून या मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.