बस्ती – उत्तरप्रदेशातील बस्ती शहरात एका स्थानिक भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. कबिर तिवारी असे या नेत्याचे नाव आहे. ते पक्षाच्या विद्यार्थी शाखेचे नेते होते.
सकाळी दहा वाजण्याच्या सुमाराला शहरातीला मालवीय रस्त्यावर रणजीत चौकात त्यांच्यावर काही अज्ञात इसमांनी गोळ्या झाडल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी लखनौला हलवले जात असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. या हत्ये मागचे कारण समजले नाही. त्यांच्या मारेकऱ्यांना त्वरीत अटक करा या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी आज त्यांचा मृतदेह स्थानिक पोलिस स्टेशनच्या गेटपाशी ठेवला होता. त्यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते.