पुणे – लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणी च्या वतीने स्वर्गीय ला.सागर डोमसे यांच्या स्मरणार्थ लायन्स व्हेट्रेन टी-२० क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत स्वयुश स्ट्रायकर्स संघाने रॉयल पासलकर संघाचा एक गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले
मोशी येथील हजारे मैदान व थेरगाव येथील व्हेरॉक मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम लढतीत रॉयल पासलकर संघाने प्रथम फलंदाजी करताना २०षटकात ६बाद ११६धावा केल्या. यात अभिषेक मोहिते ४४, महेश दिवटे नाबाद २९, निलेश पासलकर २१ यांनी धावा केल्या. स्वयुश स्ट्रायकर्स संघाकडून किरण भोसले(२-१८), आदित्य पाळंदे(२-१९), प्रशांत तेलंगी(२-१९)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
प्रत्तुत्तरात स्वयुश स्ट्रायकर्स संघाने हे आव्हान १९.१ षटकात ९बाद ११७ धावा करून पुर्ण केले. यात महेंद्र जगताप नाबाद २४, श्रीनिवास सरवदे २२ यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रॉयल पासलकरकडून दर्शन वणगे(२-१६), देवा ताटे देशमुख(२-२५), प्रशांत घेवारी(३-८) यांनी सुरेख गोलंदाजी केली. अष्टपैलू कामगिरी करणारा आदित्य पाळंदे सामन्याचा मानकरी ठरला.
IND vs ENG 2nd Test : पराभवानंतरही इंग्लंडच्या नावे झाली एका ‘मोठ्या’ विक्रमाची नोंद…
निकाल : अंतिम फेरी:
रॉयल पासलकर: २० षटकात ६बाद ११६ (अभिषेक मोहिते ४४, महेश दिवटे नाबाद २९, निलेश पासलकर २१; किरण भोसले २-१८, आदित्य पाळंदे २-१९, प्रशांत तेलंगी २-१९) पराभुत वि.स्वयुश स्ट्रायकर्स: १९.१ षटकात ९ बाद ११७ (महेंद्र जगताप नाबाद २४, श्रीनिवास सरवदे २२, दर्शन वणगे २-१६, प्रशांत घेवारी ३-८); सामनावीर – आदित्य पाळंदे.