भेसळ भोवली, पुण्यात 12 ताडी विक्रेत्यांचे परवाने निलंबित

फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश

पुणे – ताडीमध्ये भेसळ केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी 12 जणांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या समक्ष सुनावणी घेवून ताडी विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

 

जिल्ह्यात 2019-20 मध्ये एकूण 16 ताडी परवाने देण्यात आले. या दुकानांमधून ताडीचे नमुने घेण्यात आले होते. ते हाफकीन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था मुंबई यांचे पाठविण्यात आले होते. या तपासणी अहवालामध्ये एकूण 12 दुकानांमधून काढण्यात आलेल्या ताडी नमुन्यामध्ये फ्लोरल हायड्रेड मिसळून भेसळ केल्याचे सिद्ध झाले आहे.

 

भेसळयुक्त ताडी सेवनाने मानवी प्रकृतीवर घातक परिणाम होत असल्याची बाब स्पष्ट होत असल्याने सदर परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये इंदापूरमधील सहा, मुळशी मधील दोन, दौंडमध्ये एक, पुरंदरमधील एका दुकानाचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.