औरंगाबाद: औरंगाबाद शहरात आज काळा गणपती मंदिरामागील वॉकिंग ट्रॅक भागात हा बिबट्या आढळला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, बिबट्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. एका कर्मचाऱ्याच्या अंगावर देखील बिबट्याने झळप घातली. चक्क सहा तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.