पुणे – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व भोर तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदे विषयक जनजागृतीसाठी “न्याय सर्वांसाठी’ घोषवाक्यानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. ए. देशमुख, तसेच दिवाणी न्यायाधीश एस. के. मुळे व पाटील मॅडम, एच यु. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात ऍड. पांडुरंग थोरवे यांचे शेत जमीनीची मोजणी व त्यासंबंधित परिपत्रके याबाबत मार्गदर्शन केले व मोजणी विषयक कार्यपद्धती, पोट हिस्सा मोजणी , मोजणी फी , अपीलबाबत माहिती, विविध जमाबंदी आयुक्त परिपत्रके, विविध मोजणी संबंधित विषयांवर मार्गदर्शन केले.
या वेळी उपस्थित ऍड. के के बांदल, ऍड. आर. एल. कोंडे, ऍड. उदय कोंढाळकर, ऍड. संध्या बाणखेले, ऍड. सुरेश शिंदे, ऍड. पोतदार मॅडम, मार्तंड जेजुरी देवस्थान विश्वस्त ऍड. प्रसाद शिंदे, आळंदी देवस्थान विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील, ऍड. सुरेखा वाडकर, भोर बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. दीपक बोरकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. जयश्री शिंदे यांनी केले.