पुणे – शासनाने नुकताच मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे येथील सायक्लोहोलिस्क सायकलिंग ग्रुपच्या 12 सायकलस्वरांनी पुणे-शिर्डी-पुणे असा 340 किलोमीटरचा प्रवास केला. 40 तासात पूर्ण केलेल्या या प्रवासात शारीरिक तंदुरुस्तीबाबात जनजागृतीचा संदेश देण्यात आला.
सायकल राईडमध्ये 12 सायकलस्वरांनी साईबाबा मंदिर, दीघी पुणे येथून शुक्रवारी (दि.10) सायंकाळी 7 वाजता शिर्डीकडे प्रस्थान केले. 170 किलोमीटचा प्रवास रात्रभर करून दुसऱ्या दिवशी सर्वजण शिर्डी येथे पोहोचले. साईबाबांचे दर्शन घेऊन त्याच् दिवशी ससयंकाळी 7 वाजता शिर्डी येथून परतीचा प्रवास सुरू करून रविवरी (दि.10) सकाळी पुण्यात दाखल झाले.
यामध्ये संजय कंकणवाडी, ऍड. सम्राट रावते, मनिष महाजन, अजित घुले, सचिन बोटे, रुपेश बोटे, नीलेश जोगी, हरदेश दलसे, विजय भरमगुंडे, दुष्यंत दुबे, आणि 16 वर्षाचे युवक श्रीराम काटकर आणि मित महाजान सहभागी झाले होते. प्रवासात नारायणगाव शिवजन्मभूमी सायकलिंग़ ग्रुपचे धनंजत माताडे, सुनील इचके, अभिजित शेटे आणि इतरांनी 12 सायकलस्वरांचे स्वागत केले. त्यांना प्रोत्साहन दिले.
याविषयी ऍड. सम्राट रावते आणि ग्रुपचे मेन्टॉर संजय कंकणवाडी म्हणाले, फिटनेसचे महत्त्व पटविण्यासाठी प्रत्येक रविवारी लांब पल्ल्याच्या राईडचे आयोजन केले जाते. यापूर्वी पंढरपूर, गेटवे ऑफ इंडिया राईडचे आयोजन केले आहे.