लाटेसोबत पोहायला शिका नाहीतर बुडाल : गौतमचा मुफ्तींना ‘गंभीर’ इशारा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी सलामीवीर गौतम गंभीर यांनी आज जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना गंभीर इशारा दिला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना गंभीर यांनी आज मेहबुबा मुफ्ती यांच्यावर निशाणा साधला असून ते म्हणतात, “मेहबुबा मुफ्ती या मला ब्लॉक करू शकतात, मात्र त्या या देशातील १३० कोटी जनतेला ब्लॉक करू शकतील काय? देशामध्ये लाट असून या लाटेसोबत पोहायला न शिकल्यास बुडण्याची शक्यता जास्त आहे. २०१४मध्ये देशात आलेल्या लाटेचे रूपांतर आता त्सुनामीमध्ये झाले असून या त्सुनामीबरोबर आता गेल्या पाच वर्षांमध्ये देशात झालेला विकास देखील आहे.”

तत्पूर्वी, ट्विटर या समाजमाध्यमावर गौतम गंभीर आणि मेहबूबा मुफ्ती यांच्यादरम्यान जम्मू-काश्मिरमधील विवादित कलम ३७०वरून वाद उफाळून आला होता. यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी गौतम गंभीर यांना ट्विटरवर ब्लॉक केलं होत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.