नवी दिल्ली – काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेविषयी चिंता करणारे पत्र काँग्रेस पक्षाने गृह मंत्रालयाला पाठविले आहे. अमेठी मधील राहुल गांधींच्या रॅली मध्ये राहुल गांधींच्या चेहऱ्यावर हिरव्या रंगाचा लेझर लाईट आढळल्याने, राहुल गांधी यांच्यावर स्नाइपर सारख्या बंदुकीने हल्ला होण्याची भीती काँग्रेस पक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
Congress claims serious breach in security of Rahul; MHA denies
Read @ANI Story | https://t.co/PJYmQjPkye pic.twitter.com/WbTXg8iIfx
— ANI Digital (@ani_digital) April 11, 2019
भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचा घातपात झाला होता. १९९१ मधील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजीव गांधी यांची हत्त्या करण्यात आली होती. याचा उल्लेख काँग्रेसने या पत्रात केला आहे. अमेठीमधील रोड शो नंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर हिरव्या रंगाचा लेझर लाईट आढळल्याने, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.
यादरम्यान राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर किमान सात वेळा हिरव्या रंगाचा लेझर लाईट दिसल्याचे काँग्रेसने या पत्रात लिहिले असून पुरावा म्हणून यावेळेचा व्हिडीओ देखील दिला आहे.