भरुच – गुजरातमधील भरूच येथे बजरंग या तिसऱ्या २५ टी बोलार्ड पुल टग जहाजाचे कमोडोर व्ही. प्रवीण यांच्या हस्ते आज जलावतरण करण्यात आले. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत शॉफ्ट शिपयार्ड कंपनीमध्ये बांधण्यात आलेले हे स्वदेशी जहाज आहे. या कंपनीशी करण्यात आलेला एकूण तीन २५- टी बोलार्ड पुल टग जहाजांची बांधणी तसेच वितरण संदर्भातील करार संपला आहे.
या प्रकारच्या जहाजांच्या उपलब्धतेमुळे, नौदलाच्या जहाजांना तसेच पाणबुड्यांना बर्थिंग तसेच अन-बर्थिंग, त्यांना वळवणे, मर्यादित पाण्यात फिरणे यासाठी मदत होईल. पाण्यात असताना तसेच नांगर टाकलेला असताना आजूबाजूच्या जहाजांना हे जहाज अग्निशमन यंत्रणेची मदत पुरवू शकेल तसेच मर्यादित स्वरूपाच्या शोधमोहीमा तसेच बचाव कार्य यांच्यात देखील भाग घेऊ शकेल.
(LAUNCH OF 25T BOLLARD PULL TUG, BAJRANG AT M/s SHOFT SHIPYARD PVT LTD, BHARUCH, GUJARAT)