सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
अकलूज – राज्याच्या विकासात सहकाराच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे सोलापूर जिल्ह्याचे सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त अकलूज येथील विजय चौकांमध्ये दुपारी 12.15 वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते, तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकासकामांचा शुभारंभ व उद्घाटन होणार आहे. सकाळी 10 वाजता जाधववाडी येथे पंचायत समिती माळशिरस यांच्या वतीने भांबुर्डी येथील विजयगंगा प्रकल्पाचा दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा आरंभ, तर सकाळी 10ः45 वाजता शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ, विजय नगर – विझोरी येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचा पुतळा अनावरण समारंभ आणि 1 मेगावॅट सोलर प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 11.30 वाजता अकलूज ग्रामपंचायतीच्या मच्छी मार्केट इमारतीचे उद्घाटन, 12.05 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज येथील डाळिंब फळ मार्केट इमारतीचा उद्घाटन आणि दुपारी 12.15 वाजता अकलूज येथील विजय चौकांमध्ये भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सुधाकरपंत परिचारक, खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, आमदार जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार राजाभाऊ राऊत, आमदार राम सातपुते, बबनराव आवताडे, नारायण पाटील, अनिरुद्ध कांबळे, दिलीप सावंत, जिल्हा अधिकारी राजेंद्र भोसले, प्रकाश वायचळ, कल्याणराव काळे, शहाजी पवार, किरण देशमुख, शिवानंद पाटील, विजयराज डोंगरे, समाधान आवताडे, मलिकार्जुन पाटील उपस्थित राहणार आहेत असल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिली.