पुणे – लॉकडाऊनमुळे आहे त्याच ठिकाणी अडकलेल्या मजुरांची तहसील कार्यालयामार्फत नोंदणी करून त्यानुसार रेल्वे, एसटी बसेस, खासगी बससेने आपल्या मुळगावी रवाना करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील काही गावांतून रविवारी (दि. 10) एसटी बस व खासगी बसेसद्वारे राज्यांतर्गत व परराज्यतील प्रवासी घेऊन या बसेस रवाना झाल्या आहेत. तर आपल्या मुळगावी निघाल्याचा आनंद या मजुरांमध्ये होता. जाताना आवर्जुन या मजुरांनी राज्यशासनासह स्थानिक प्रशासनाचे आभार मानले.