पाथर्डीत व्यावसायिकांना आता सवलत

पाथर्डी  (प्रतिनिधी) – पाथर्डी शहरातील व्यावसायिकांनी दुकाने उघडण्यासंदर्भात प्रशासनाकडे केलेला मागणीला प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. शहरातील वेगवेगळ्या व्यवसायिकांना वेळ व वार ठरवुन प्रायोगिक तत्त्वावर दुकान उघडण्याची परवानगी तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली आहे.

व्यवसायाच्या ठिकाणी व्यापाऱ्यांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक असून त्यात हलगर्जीपणा केल्यास व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार पाटील यांनी व्यवसायाचे तीन टप्प्यात वर्गीकरण केले आहे. सकाळी नऊ ते दुपारी तीनपर्यंतच व्यवसायिकांना दुकाने उघडी ठेवता येणार असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

प्रशासनाने केलेल्या वर्गीकरणानुसार सोमवार व गुरुवार कापड, टेलर, लॉड्री ही दुकाने उघडली जाणार आहेत तर मंगळवार व शुक्रवार फर्निचर, मशिनरी, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, मोबाईल, भांडी दुकान, हार्डवेअर, बिल्डिंग मटेरियल आदी व्यावसायिकांचा समावेश आहे.

बुधवार व शनिवारी सराफ दुकाने, बेकरी, स्वीटमार्ट, स्टेशनरी, ऑटोमोबाईल, स्पेअरपार्ट, गॅरेज, फुटवेअर या व्यवसायासाठी परवानगी देण्यात आली आहे. रविवारी जीवनावश्यक दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतर व्यवसाय मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.