जामखेड – ग्रामीण भागातील महिला आपली नेहमीची कामे करून स्वत:साठी खास वेळ काढून सामाजिक भान जपत स्वत:च्या इच्छेनुसार जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा एक सकारात्मक विचार आहे. महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण आणि आत्मविश्वासवृद्धी या त्रिसूत्रीचा आपण उपयोग करून आपल्यासोबत कुटुंबाचा विकास कसा साधू शकतो असे प्रतिपादन लक्ष्मीपुत्र फाऊंडेशनच्या सचिव व भाजपाच्या नेत्या मंजुश्रीताई जोकारे यांनी केले
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मकरसंक्रांतीनिमित्त नान्नज येथे लक्ष्मीपुत्र फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला.यावेळी भाजपाच्या मनीषा मोहळकर. रेखा मोहळकर. स्वरुपा पंडित. वंदना पवार. सुनिता कोळपकर. सुमन पंडित वैशाली मोहळकर ,मीना मोहळकर , मनीषा राऊत ,मुक्ता मोहळकर , सुवर्णा मलंग्नेर ,ज्योती मलंगणेर , शोभा मोहळकर , स्वाती गोरे. पुष्पा मोहळकर. अर्चना माकुडे . माया माकुडे. पूजा रजपूत. मैना मलंग्नेर
यांच्यासह नान्नज परिसरातील 900 च्या वर महिला भगिनी उपस्थित होत्या त्यात जेष्ठ महिला आणि नव विवाहित महिलांच्या उखाण्यांनी रंगत आणली. पुढाऱ्यांच्या कारभारणींनी प्रसंगी उखाणे घेतले. त्यामुळे नान्नज येथील हा हळदी कुंकू समारंभ सार्वत्रिक आनंद देणारा ठरला.उपस्थित महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.यावेळी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.
लक्ष्मीपुत्र फाऊंडेशनच्या सचिव मंजुश्रीताई जोकारे या नेहमी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करतात. सामाजिक कार्यात त्याचा नेहमी अग्रेसर असतात यावेळी महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्यात आले. महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर विचार मांडण्यात आले