Amit Shah’s Maharashtra visit canceled – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा १५ तारखेला होणारा छत्रपती संभाजीनगर, जळगाव दौरा रद्द झाला आहे. हा दौरा पुढे ढकलण्यात आला असल्याच देखील बोललं जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रातील अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील १५ लोकसभा मतदारसंघांतील तयारीचा आढावा यांच्याकडून घेण्यात येणार होते. या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार होते. | Amit Shah’s Maharashtra visit canceled
दिल्लीवर चालू येत असलेल्या राजस्थान, पंजाबमधील शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे केंद्रीय गृहमंत्री यांनी आपला गुजरात दौरा रद्द केला. त्यापाठोपाठ त्यांनी महाराष्ट्र दौरा देखील रद्द केला असल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांकडून दिली जात आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी शहांचा हा दौरा आयोजित होता. १७ सप्टेंबर रोजी अमित शाह यांचे वेळेचे नियोजन होत नसल्यामुळे,हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. | Amit Shah’s Maharashtra visit canceled
विशेष म्हणजे अमित शहा त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान जळगाव जिल्ह्यातील कार्यक्रमातही हजेरी लावणार होते.या दौरा स्थगित झाल्याच्या बातमीला जळगाव जिल्हा प्रशासनाने सुद्धा दुजोरा दिलेला आहे. | Amit Shah’s Maharashtra visit canceled