कोयनानगर – कोयनानगर, ता. पाटण येथे राज्याचे उत्पादन शुल्क तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त कोयना स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने पालकमंत्री क्रिकेट चषकाचे आयोजन करण्यात आले होते. हा चषक “लाड फायटर’ या संघाने पटकाविला. द्वितीय क्रमांक शैलेंद्र लायन्स, तर राडा इलेव्हन या संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
हेमंत चाळके हा खेळाडू पालकमंत्री क्रिकेट चषक स्पर्धेचा मालिकावीर ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहायक शशिकांत जाधव व शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
कोयना स्पोर्ट असोसिएशन यांच्यावतीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमीत्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहायक शशिकांत जाधव यांनी ही स्पर्धा प्रायोजित केली होती. यामध्ये प्रथम क्रमांक 30 हजार रुपये रोख व चषक, दुसऱ्या क्रमांक 20 हजार रुपये, तर तिसऱ्या क्रमांकासाठी दहा हजार रुपये असे बक्षिसाचे स्वरूप होते. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सावळाराम लाड, देसाई कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोकराव पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग नलावडे, बाजार समितीचे सभापती बाळासाहेब पाटील, माजी सरपंच मनीष चौधरी उपस्थित होते.