कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांची मुलगी इनाया नौमी खेमू खूपच क्यूट आहे. इनायाचे अनेक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. कुणालचे इनायावर खूप प्रेम असून त्याने तिच्या नावाचा एक टॅटूही बनविला आहे. या टॅटूचा फोटो कुणालने चाहत्यांशी शेअर केला आहे.
हा फोटो शेअर करत कुणालने पोस्ट केले की, हा टॅटू माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. माझी इनाया ही कायमच माझा एक हिस्सा राहणार आहे. या टॅटूत तिचे नाव मध्यभागी आहे. तसेच तिचे मिडन नेम नौमी याचा अर्थ देवी दुर्गा असा असून तो लाल रंगाच्या बिंदूत दर्शविण्यात आला आहे. यासोबतच दोन्ही टोकांवर त्रिशूल बनविण्यात आले आहे. हे टॅटू मला खूपच आवडले आहे.
दरम्यान, एका मुलाखतीत कुणालने इनायाबद्दल सांगितले होते की, इनायाचा वडील होणे ही माझ्या जीवनातील सर्वात चांगली गोष्ट आहे. प्रत्येक दिवसी ती सोहा आणि माझ्या जीवनात सकारात्मकता आणि आनंद घेवून येत असते. ती हिच आहे जिने मला लॉकडाउनमध्ये सकारात्मक पद्धतीने जीवन जगण्यास मदत केली. इनायानेच आमच्या हॅबिट्स बदलल्या आहेत.’